राजकारण

Ashok Chavan : भाजपामध्ये प्रवेश करण्याआधी अशोक चव्हाण म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.

याच पार्श्वभूमीवर आज अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत . देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता हा पक्षप्रवेश होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, आज मी माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करत आहे. आज मी भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. दुपारी बारा - साडेबाराच्या दरम्यान हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये अन्य जिल्ह्यातील काही संभाव्य लोकं प्रवेश करण्याची शक्यता आहे. मी तिथे आता निघालो आहे. असे अशोक चव्हाण म्हणाले.

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...

Uddhav Thackeray : 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण