Chandrashekhar Bawankule | Chandrakant Patil
Chandrashekhar Bawankule | Chandrakant Patil Team Lokshahi
राजकारण

चंद्रकांत खैरे लोकांना भडकावतायत, गुन्हा दाखल झाला पाहिजे, बावनकुळेंचे प्रत्युत्तर

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त विधानामुळे एकच गोंधळ सुरु आहे. त्यातच पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. या शाईफेकीनंतर एकच खळबळ राजकारणात माजली. या शाईफेकीचे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून विरोध, समर्थन सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज आज शिवसेना ठाकरे गट नेते चंद्रकांत खैरे यांनी अजब विधान केले आहे. त्याच विधानाला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हिंगोलीत प्रसार माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी खैरेंच्या विधानाला उत्तर दिले आहे. त्यावेळी ते म्हणाले की, कोणत्याही पक्षाचा नेता, मंत्री किंवा पदाधिकारी असो, त्याच्यावर अशा प्रकारे शाईफेक किंवा हल्ला झाला तर त्याचे समर्थन कसे होऊ शकते. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. चंद्रकांत खैरे यांनी जर चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्या व्यक्तीचे समर्थन केले असेल, तर मग त्यांना महाराष्ट्राची संस्कृतीच माहित नाही असे म्हणावे लागेल. असं मत बावनकुळे यांनी मांडले.

पुढे ते म्हणाले की, खैरे अशा पद्धतीने जर समर्थन करत असतील तर ते चुकीचे तर आहेच, पण ते लोकांना भडकावत आहेत, असेच म्हणावे लागेल. आणि मग चंद्रकांत खैरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे?

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणाचे मी समर्थन करणार नाही, पण ज्याने शाईफेक केली त्याने राग व्यक्त केला, त्याचे मी अभिनंदन करतो. कोणीही उठायचे आणि छत्रपती शिवाजी महाराज, महापुरूषांचा अपमान करायचा हे खपवून घेता येणार नाही. लोकांनी याबद्दलचा राग व्यक्त केलाच पाहिजे. असे चंद्रकांत खैरे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित

शिवाजी पार्कात PM नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ठाकरेंची 'राज'गर्जना; म्हणाले,"समुद्रात शिवछत्रपतींचा पुतळा..."