Nilesh Rane | Ajit Pawar
Nilesh Rane | Ajit Pawar  Team Lokshahi
राजकारण

घोटाळा आणि अजित पवार समानार्थी शब्द, निलेश राणेंचे बोचरी टीका

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय वातावरण गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे. हे सर्व सुरु असताना राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनाच्या एक दिवस आधी विरोधकांनी चहापाण्यावर बहिष्कार घातला. त्यावेळी विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी अजित पवार यांनी सिंचन प्रकल्पावरून आपली बदनामी केल्याचा आरोप भाजपवर केला. त्यावरूनच आता भाजप नेते निलेश राणे यांनी पवारांवर बोचरी टीका केली आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सिंचन प्रकल्पावरून आपली बदनामी केल्याचा आरोप भाजपवर केला. त्यावर आता निलेश राणे ट्विटरवरून अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, घोटाळा आणि अजित पवार समानार्थी शब्द आहेत, नशिब आहे तुमचं साहेब तुम्ही बाहेर आहात पण किती वेळ कोण सांगू शकत नाही. सकाळी टीका करता संध्याकाळी सांभाळून घ्या म्हणून फोन करता. अशी बोचरी टीका अजित पवारांवर त्यांनी केली आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

१९९९ ते २००९ या काळात पाटबंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. सिंचनावर ७० हजार कोटी रुपये खर्च झाले. या काळात पवार हे जलसंपदा मंत्री होते. तर विरोधी पक्षात भाजप होते. जयंत पाटील अर्थमंत्री असताना कोटय़वधींची कामे केली आणि वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले.

त्यावेळी मी सुधारित प्रशासकीय मान्यता देत होतो. वरिष्ठ सभागृहात नितीन गडकरी, बी. टी. देशमुख आदी सदस्यांनी वेगाने निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे त्याला मान्यता दिली गेली. प्रकल्पांच्या किंमत अव्वाच्या सव्वा वाढल्याचे समजल्यावर सुधारित प्रशासकीय मान्यता मंत्रिमंडळापुढे जायला लागल्या. साधारणत: पाच ते सात वर्षे प्रकल्प पुढे गेला की, त्या प्रकल्पाची किंमत दुप्पट होते. आताही त्या प्रकल्पांना कोटय़वधीच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या जात आहेत. केवळ आता त्याला मंत्रिमंडळाची मान्यता असल्यामुळे कोणी बोलायला तयार नाहीत, असे ते म्हणाले होते.

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका

'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठिशी' प्रकाश शेंडगे यांची टीका

Uddhav Thackeray : 'मोदींवर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईन, पण...', ठाकरेंचा PM मोदींना टोला