Chandrashekhar Bawankule | Jitendra Awhad | Sharad Pawar
Chandrashekhar Bawankule | Jitendra Awhad | Sharad Pawar Team Lokshahi
राजकारण

बावनकुळेंचे मोठे विधान; शरद पवार आणि पक्षाने जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करावे...

Published by : Sagar Pradhan

राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकारी महिलेच्या आरोपानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. त्यावरच आता पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घ्यावा, अशी बावनकुळे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांमार्फत आव्हाड यांच्यावर 354 चा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. यावरून भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यावरच बोलताना बावनकुळे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळीच राजीनामा देणार असल्याचं ट्विट केलंय. मात्र आव्हाड हे नौटंकी करत आहेत. हि्ंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केले.

पुढे ते म्हणाले की, शरद पवार आणि पक्षाने जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करावे. सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करू नये, आम्ही अब्दुल सत्तारांचे कधी समर्थन केले नाही. महाराष्ट्रात शिंदे आणि भाजप एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहेत. बारामतीत शरद पवार यांची 60 वर्षे सत्ता होती. म्हणजे काही उपकार नाही केले. गावात त्यांची दहशत होती, असं वक्तव्य बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे मैदानात

Nashik Crime: नाशिकमध्ये ICICI होम फायनान्समध्ये मोठी घरफोडी

Girgaon Linkedin Post Viral: गिरगावात जॉबसाठी आक्षेपार्ह जाहिरातीमुळे संताप; मराठी माणसालाच केली बंदी

आमदार रोहित पवार यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले...

'कासरा' चित्रपटाचा ट्रेलर लाँच; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला