राजकारण

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याकडून गोपनीयतेचा भंग; मतदानावेळी ईव्हीएम मशीनचा काढला फोटो

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : राज्यात प्रतिष्ठीत बनलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. परंतु, कसब्यातून गंभीर प्रकार समोर येत आहे. राष्ट्रवादीत्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाला आहे. मतदानावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनचा फोटो काढून फेसबुकवर शेअर केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास मनाई

कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा फोटो काढला व फेसबुकवर शेअर केला. यात त्या ईव्हीएममध्ये रविंद्र धंगेकर यांच्या समोरील बटण दाबताना दिसत आहे. सोबतच, कसब्याचा नव्या पर्वाची, कामाची सुरवात. आपला माणूस, कामाचा माणूस. कसबा मतदारांचा, अशी पोस्ट रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. मतदान करतानाचा हा फोटो आता चांगलाच व्हायरल झाला आहे. राज्यातील प्रतिष्ठीत नेतेच असे वागत असतील तर सामान्य माणसाचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहील का, असा प्रश्न अनेक नेटकरी विचारताना दिसत आहे. तसेच, निवडणूक आयोग या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मतदारांना दिल्या जाणाऱ्या ‘व्होटर स्लिप’वर पाठीमागील बाजूस मतदानकर्त्यांसाठी पाच सूचना दिलेल्या असतात. यामध्ये मतदान केंद्राच्या 100 मीटर परीघात मोबाईल बाळगण्यास किंवा वापरण्यास मुभा (परवानगी) नाही. केवळ निवडणूक कर्मचाऱ्यांनाच मोबाईल बाळगण्यास परवानगी असून, त्यांना फोन सायलेंट मोडवर ठेवणे बंधनकारक आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाणे आणि केलेल्या मतदानाचे चित्रीकरण किंवा व्हिडीओ करणे कायदयाने गुन्हा आहे.

दरम्यान, भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत भाजपने कसबा पेठमधून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीतर्फे कसब्याची जागा काँग्रेस लढत असून येथून रवींद्र धंगेकर रिंगणात आहेत. तर, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेही या निवडणुकीत उतरले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल