राजकारण

रविंद्र धंगेकरांची उमेदवारी होणार रद्द? भाजप आक्रमक

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असेलली राजकीय रणधुमाळीमुळे पुण्यातील वातावरण ढवळून निघाले होते. दरम्यान, प्रचार संपताच भाजपने पोलिसांसोबत कसब्यात पैसे वाटल्याचा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. याविरोधात त्यांनी आज उपोषण केले. या आरोपानंतर भाजप आक्रमक झाली असून धंगेकरांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

भारतीय जनता पक्षाने प्रचारादरम्यान पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर पत्नीसमवेत हे आज सकाळी १० वाजता कसबा गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसले होते. यादरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.

याविरोधात रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. रवींद्र धंगेकरांनी उपोषण करत निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली. या सर्वा पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग कारवाई करणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान, रविंद्र धंगेकर मागील 25 वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळं कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागामध्ये रविंद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. शिवाय त्यांची सामान्यांचे नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळं कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत बघायला मिळत आहे.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा