राजकारण

सत्तार बोलले तो विनयभंग नाही का? सुळेंचा शिंदेंना सवाल; तुमच्या आमदाराचे सौ गुन्हे माफ का?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांना केलेली अटक तसेच त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे आता राजकारण चांगलंच तापले आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खोटा गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र आव्हांडाना वैयक्तिक आणि पक्ष म्हणून राजीनामा देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, सत्तार बोलले तो विनयभंग नाही का? शिवीगाळ करता तो विनयभंग नाही का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, खोटा गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र आव्हांडाना वैयक्तिक आणि पक्ष म्हणून राजीनामा देऊ नका, असे आवाहन करते. लोकांसाठी त्यांच काम मोठे आहे. जयंत पाटील आणि अजित पवार बोलले आहेत. लढल पाहिजे. वाईट वाटणे साहजिक आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर जितेंद्र आव्हाडांशी बोलले दुर्दैव आहे. राजकारणाची पातळी इतकी खालावली आहे का, मुख्यमंत्री सगळे कार्यकर्ते होते तरीही आरोप होतो. वाईट वाटतय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

महिला म्हणून राजकारणात येतो तेव्हा मेरीटवर मिळावे ही अपेक्षा असते. खोट्या आरोपामुळे ज्यांना गरज असते. त्यांना मदत मिळत नाही. बऱ्याच जणांना तसं वाटत देशात लोकशाही राहिली नाही. जस्टीस डी.वाय. चंद्रचूड म्हणाले होते, कायदा दडपशाहीच साधन बनू नये. मी अंजली दमानिया यांचे महिला म्हणून जे स्टेटमेंट केले त्यांची आभारी आहे, असेही त्यांनी म्हंटले होते.

अब्दुल सत्तार बोलले तो विनयभंग नाही का? शिवीगाळ करता तो विनयभंग नाही का? मी तक्रार करत नाही. पण, तुमच्या आमदारांनी केलेले सौ गुन्हे माफ का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केले आहेत. संजय राठोड यांच्या बाबतीत तेव्हाही तीच भूमिका होती. आजही तीच भूमिका आहे. चौकशी व्हायला हवी होती. मी तेव्हाही आरोप केले नव्हते आणि आता ही बोलणार नाही, अशे त्यांनी म्हंटले आहे.

मला काळजी वाटतेय. राज्यात काय सुरूय, कायदा सुव्यवस्था आहे का? खोटे-नाटे आरोप केले जाताहेत. मंत्रालयात गेल की कुणी भेटत नाही. राज्य चालवण शक्य नसेल तर निवडणुका घ्या. सगळ्याच तेच मत असेल तर होऊन जाऊद्या, असा आव्हान त्यांनी केले आहे.

दरम्यान, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ अंधारे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावरही सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. गलिच्छ राजकारण सुरु आहे. आरोप करा. पण, खोटे आरोप करू नका, कुटूंब उध्वस्त होत आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, म्हणाले...