राजकारण

'खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे निधन झाले. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे. राजकारणातील एक सर्वसमावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'