Eknath Shinde | Nana Patole
Eknath Shinde | Nana Patole Team Lokshahi
राजकारण

आता जनताच ठरवेल कोण पाकिस्तान आणि कोण भारत, पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

Published by : Sagar Pradhan

काल भारत आणि पाकिस्तानमध्ये हाय होल्टेज सामना पार पडला. हा सामना भारताने जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी बोलताना आम्हीसुद्धा साडे तीन महिन्यांपूर्वी एक मॅच जिंकलो आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विधान केले होते. त्यावरूनच प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार निशाणा साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मानसिकता खराब असेल आणि सत्तेची गर्मी असेल तर यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही.सरकारने जनेतेच्या हितासाठी काम करावे. मात्र, महाराष्ट्रातील सरकार ने विकासाचे काम थांबून आज सरकार हेकेखोर पणाने वागत आहे. त्यामुळे आता जनताच ठरवेल कोण पाकिस्तान आणि कोण भारत अशे प्रतिउत्तर नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदेंना प्रतिउत्तर दिले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आनंदाचा शिधा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहचलेला नाही. त्यामुळे गरीब जनतेला दिवाळी अंधारात साजरी करावी लागत आहे. हे सर्व शिंदे सरकारमुळे घडत आहे. गरीबांची दिवाळी अंधारात घालण्याचे काम महाराष्ट्रातील भाजपाच्या ईडी सरकारने केले असा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री शिंदे?

ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी आज उपस्थिती दर्शवली. त्यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. साडेतीन महिन्यापूर्वी आम्हीही एक मॅच जिंकली, असे सांगत असतानाच मेलबर्नमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा झळकलेल्या बोर्डचा उल्लेखही शिंदे यांनी केला.

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Daily Horoscope 17 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना साडेसातीचाही होणार त्रास; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 17 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना