राजकारण

सांगलीत काँग्रेसचा मेळावा; शरद पवार गटाचा जाहीरनामा होणार प्रसिद्ध

Published by : Dhanshree Shintre

लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी म्हणजेच 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत. तसेच आज सांगलीमध्ये काँग्रेस मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे पुण्यात शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील अनेक उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरुर-आंबेगावचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच रक्षा खडसे, स्मिता वाघ, भुमरे, पाडवीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप