राजकारण

काँग्रेसने शेअर केला RSS पोशाखाचा फोटो; भाजप नेते आक्रमक

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा आज सहावा दिवस आहे. काँग्रेसच्या यात्रेवरुन भाजप नेत्यांनी पहिल्या दिवसांपासून टीका केली आहे. शीख दंगली ते मुंबई दंगलीचा संदर्भ देत भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यादरम्यान कॉंग्रेस एक फोटो ट्विट केला आहे. यावर काँग्रेसला आग लावण्याची जुनी सवय असल्याचे भाजपने म्हटले आहे.

काँग्रेसने एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत आरएसएसचा ड्रेस पेटताना दिसत आहे. त्यात धूरही निघताना दिसत आहे. काँग्रेसने ट्विटमध्ये आम्ही देशाला द्वेषाच्या वातावरणातून मुक्त करण्याच्या आणि आरएसएस-भाजपने केलेल्या नुकसानीची भरपाई करण्याच्या दिशेने एकापाठोपाठ एक पाऊल टाकत आहोत. आम्ही आमच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहोत, असे लिहिले आहे.

काँग्रेसच्या या ट्विटनंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हंटले की, देश जाळण्याची काँग्रेसची जुनी सवय आहे. 1984 ची दंगल असो, जळगाव, मुंबई, हाशिमपुरा, भागलपूर किंवा मेरठ असो. ही यादी मोठी आहे. राजीव गांधींनी 1984 च्या दंगलीचे समर्थन कसे केले हे देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे. ते म्हणाले, काँग्रेस फक्त देश जाळण्याचा विचार करते, अशी टीका त्यांनी केली आहे.

तर, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी काँग्रेसचा कौटुंबिक व्यवसाय आहे. एकतर आम्ही देश तोडू किंवा देश जाळून टाकू, असा घणाघात केला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेले योगी सरकारमधील मंत्री जितिन प्रसाद म्हणाले की, राजकीय मतभेद नैसर्गिक आणि समजण्यासारखे आहेत. पण राजकीय विरोधकांची पोळी भाजण्यासाठी कोणत्या मानसिकतेची गरज आहे? या नकारात्मकतेच्या आणि द्वेषाच्या राजकारणाचा सर्वांनी निषेध केला पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.

'बिग बॉस मराठी'चा ५ व्या सीझन लवकरच येणार भेटीला; 'हा' मराठमोळा अभिनेता करणार होस्टिंग

अंधेरीत उद्या 16 तास पाणीपुरवठा बंद

Sanjay Raut : जेथे जेथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल तेथे अशाप्रकारे कासवगतीने यंत्रणा चालवली

कान्समध्ये "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" चित्रपटाचा बोलबाला

पाण्यासाठी मराठवाड्यातील शेतकरी आक्रमक; पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन