राजकारण

शिंदे सरकार फक्त अजित दादांना घाबरते; मुंडेंचा टोला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : सरकार आलं का? स्थापन केले हे त्यांना सुध्दा कळलं नाही. लोकांचे प्रश्न सोडवत नसतील तर धास्ती घेतात. हे सरकार कोणाला घाबरत नाही. ते फक्त विरोधी पक्षनेते अजित दादांना घाबरतात, असा टोला राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी शिंदे सरकारला लगावला आहे. ते बीडमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

धनंजय मुंडे म्हणाले की, नव्याने आलेले सरकार फार मजेशीर आहे. सेना फोडली त्यातून मुख्यमंत्री केलं. भाजपला उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे काय मिळवलं आणि काय गमावलं, असा निशाणा त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

मराठवाड्यावर दादांचे पहिल्यापासून प्रेम आहे. कोविड काळात आघाडी सरकारने मदत दिली. सरकार आलं का? स्थापन केले हे त्यांना सुध्दा कळलं नाही. लोकांचे प्रश्न सोडवत नसतील तर धास्ती घेतात. सरकार बेशिस्त वागत आहे. त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून दादा सरकारला शिस्तीत आणून दाखवलं हे सरकार कसं तेच कळत नाही. हे सरकार कोणाला घाबरत नाही ते फक्त विरोधी पक्षनेते अजित दादाला घाबरतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

सुरत गुवाहाटी गोवा मुंबईत आलं. 42 दिवस सरकार स्थापन करायला लागले. तरी जिल्हयाला पालकमंत्री नाही. पालकमंत्री निवडता आला नाही. एकाकडे 7-8 खाते आहे. त्यातीलही काही जण नाराज आहेत. हे अजब सरकार आहे. मंत्री करायला एवढा वेळ लावतात तर विकास करायला किती वेळ लावणार, अशी धनंजय मुंडेंनी शिंदे सरकारवर कडाडून टीका केली.

आघाडी सरकार मध्ये 700 कोटी विमा मिळाला आणि या सरकारमध्ये फुटी कवडी मिळाली नाही. आम्ही आमचा विमा घेणारच. येत्या काळात सर्व निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Hording Collapse Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे पालिका प्रशासनाची अनधिकृत होर्डिंग्सवर धडक कारवाई

Ravindra Dhangekar: आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणामधून सहाव्या आरोपीला अटक

Dada Bhuse : नाशिकची जागा ही आपल्या सर्वांच्या प्रतिष्ठेची जागा

GT VS KKR: गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना पावसामुळे रद्द! गुजरात संघ प्लेऑफमधून बाहेर