Eknath Shinde | Devendra Fadnavis
Eknath Shinde | Devendra Fadnavis team lokshahi
राजकारण

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशांव्यतिरिक्त 'हे' पण देण्यात आलं, राजकारणावर मोठं वक्तव्य

Published by : Shubham Tate

mamata banerjee Eknath Shinde : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी शिंदे सरकारला बेकायदेशीर ठरवत गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की, उद्धव सरकार पाडण्यासाठी शिवसेनेच्या (Shiv Sena) बंडखोर आमदारांना पैसे दिले गेले. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्टमध्ये ममता यांनी ही माहिती दिली. (eastn mamata banerjee says people will become bulldozer for bjp Eknath Shinde)

ममता बॅनर्जी यांना महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, शिंदे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांनी सरकार जिंकले पण महाराष्ट्राचे मन जिंकली नाहीत. बंडखोर आमदारांचा संदर्भ देत ममता म्हणाल्या की, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आसाममधील हॉटेलमध्ये लक्झरी लाइफ एन्जॉय केली. त्याचा पैसा आला कुठून? बंडखोर आमदारांना फक्त पैसेच पुरवले जात नव्हते आणि इतर अनेक गोष्टी तिथे पुरवल्या जात होत्या. या सर्व गोष्टी कुठून आल्या?

'दुसरे काही' म्हणजे काय? यावर ममता यांनी गप्प बसणे स्वीकारले.

ममता पुढे म्हणाल्या की, भाजप काय करू शकतो, काय करू शकत नाही हे मला माहीत आहे. मला काय म्हणायचे आहे ते सर्वांना समजले आहे. मी म्हणते m, m, m, m, m, n, n, n....w, w, w, w, w आता लोक स्वतः अंदाज लावू शकतात.

जनता भाजपसाठी बुलडोझर ठरेल: ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. भारतीय जनता पक्षावर तोंडसुख घेत ममता बॅनर्जी यांनी पुढच्या निवडणुकीत देशातील जनता भाजपसाठी बुलडोझर ठरेल, असेही म्हटले आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पुढची निवडणूक भाजप विरुद्ध भारत की जनता अशी असेल. तसेच असे सूडबुद्धीचे सरकार मी पाहिलेले नाही. लोक लोकशाही मार्गाने भाजपला बुलडोझर हटवतील.

"हे मोदी सरकार नव्हे, हे तर गजनी सरकार"; उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'

"कुणी भारताला थप्पड मारली, तर त्याचा जबडा तोडण्याची हिंम्मत आजच्या भारताकडे आहे", सोलापूरात योगी आदित्यनाथ कडाडले

"देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदीच जबाबदार", मविआच्या सभेत शरद पवारांचा महायुतीवर घणाघात

"नरेंद्र मोदींचं काम पाहून राज ठाकरेंनी..."; शिवतीर्थावर ठाकरेंची भेट घेतल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

"...तर सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेश म्हस्केंचं मोठं विधान