राजकारण

पंकजा मुंडे यांचे विधान दुःखद आणि वेदनादायी : एकनाथ खडसे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मंगेश जोशी | जळगाव : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मी भाजपची आहे. भाजप माझं थोडीच आहे, या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांचे विधान दुःखद व वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये छळ होतो आहे, असा दावाही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे व मुंडे परिवाराने संपूर्ण आयुष्य पक्षासाठी घातलं. मात्र, ज्यांनी भाजप पक्ष वर्षानु वर्ष वाढवला व बहुजनांपर्यंत पोहोचवला. अशा जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये छळ होत असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे. पंकजा मुंडे यांची अशी अवस्था असते म्हणजे भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

तर, गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर उपस्थित राहणार असून याप्रसंगी एकनाथ खडसे पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांची देखील भेट घेणार असल्याचेही समजते आहे. या भेटीत राजकीय चर्चा देखील होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण तो मोठा पक्ष आहे. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. महादेव जानकर जातील मेंढ्या वळायला. अजून काय आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...