राजकारण

गजानन कीर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश; अमोल कीर्तीकर म्हणाले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार वाद सुरु असताना दुसरीकडे मात्र, शिवसेनेतील गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. मुंबईतून शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. परंतु, गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल यांनी मात्र शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

गजानन किर्तीकर हे शिवसेनेत म्हणजेच ठाकरे गटात अनेक दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. अशातच शनिवारी गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. किर्तीकर यांना ठाकरे गटातील एकनिष्ठ खासदार मानलं जात होते. पण त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटाची ताकद वाढली आहे. परंतु, गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांनी शिवसेनेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिवसेनेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

अमोल किर्तीकर म्हणाले, मी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबत आहे. मी राऊतांची आज भेट घेतली. गजानन किर्तीकर यांनी घेतलेला निर्णय हा वैयक्तिक आहे. पण, मी माझी भूमिका स्पष्ट केली असून शिवसेनेच्या वाढीसाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊच यांनी अमोल किर्तीकर यांचे कौतुक केले आहे. अमोल किर्तीकर कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबतच आहेत. गजानन किर्तीकरांनी घेतलेल्या निर्णयात ते सहभागी नाहीत. त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. १०० दिवसांनी तुरुंगातून सुटल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला अमोल आमच्यासोबत राहिल्याने झाला आहे. अशाच कडवट लोकांसोबत शिवसेनेचा प्रवास पुढे जाणार आहे. आम्हाला अनेक लोक सोडून गेले. पण गजानन किर्तीकर सोडून गेल्याचं दु:ख आम्हाला जास्त आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...