राजकारण

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील हे स्वप्नातही पाहिले नव्हते, पण...; गुलाबराव पाटलांचा टोला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मंगेश जोशी | जळगाव : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले. याला शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जिथे शिंदे सरकार चुकते आहे. तिथे शिंदे सरकारवर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांना संधी आहे. उद्धव ठाकरे विरोधी पक्षाची भूमिका बजावत असून टीका करणे हे त्यांचे कर्तव्यच असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, गद्दार, खोके, रेडे हे शब्द सर्वांना पाठ झाले असून हे शब्द नवीन नाहीत. त्यामुळे त्यांनी ते म्हणत राहावं. मात्र, गद्दारी कोणी केली यावर दहा वेळा प्रवचन झाले आहे. त्यामुळे जुन्या कढीला ऊत देण्यात अर्थ नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील हे स्वप्नातही पाहिले नव्हते पण ते झाले; गुलाबराव पाटलांचा टोला

ज्योतिष्य भविष्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात आहे. मात्र, भविष्यावर बोलून काही अर्थ नसून कर्मामध्ये व धर्मामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्याच सत्य असतात. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील हे कधीही स्वप्नामध्ये पाहिलं नव्हतं. पण ते झाले, असा टोला गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, असंही कोणीही पाहिलं नव्हतं. पण, ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे या लोकशाहीमध्ये कोणीही कधीही मोठा होऊ शकतो. याबाबत मागच्या इतिहासातील दाखले आहे व आजही ते पाहायला मिळतात. त्यामुळे भविष्य या गोष्टीवर आपला विश्वास नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदेंची कामख्या मातेवर श्रद्धा, केवळ टीका करायची म्हणून संजय राऊत टीका करतात'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह कामख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात देव नाहीत का असा प्रश्न उपस्थित करत केला आहे. दरम्यान देव माणसातही आहे व सर्व ठिकाणी आहे. मात्र, देव हा श्रद्धेचा भाग असून कोणी चारधाम करतं. तर कोणी मक्का मदीनाला जातो, कोणी चर्चमध्ये तर कोणी गुरुद्वारामध्ये जातो. त्यामुळे प्रत्येक धर्माप्रमाणे श्रद्धा जोपासली जात असून कदाचित एकनाथ शिंदेंना कामख्या मातेवर श्रद्धा असेल म्हणून ते त्या ठिकाणी गेले पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रात देव नाही. केवळ टीका करायची म्हणून संजय राऊत हे टीका करत असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे छगन भुजबळ यांची भेट घेणार

विशाल पाटील यांच्या बंडखोरीचा फटका चंद्रहार पाटील यांना बसण्याची शक्यता

भाजप नेत्यांकडून आज राज्यात सभांचा धडाका

मारुतीला पानांचा हार अर्पण करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या...

Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप