uddhav thackeray sanjay raut
uddhav thackeray sanjay raut Team Lokshahi
राजकारण

महाविकास आघाडीची सोमवारी मुंबईत महत्वाची बैठक, अपक्षही लावणार हजेरी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कोल्हापूर : राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) जवळ आली असून सत्ताधारी-विरोधी पक्षाकडून विजयाचे दावे सुरु आहेत. अशातच गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. सात जूनला महाविकास आघाडीच्या (Mahavikas aghadi) आमदारांची मुंबईत बैठक होणार असून यात अपक्ष आमदारही सोबत असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सतेज पाटील म्हणाले, सात जूनला महाविकास आघाडीच्या आमदारांची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला अपक्ष आमदारही सोबत असणार आहेत. अपक्षांना भाजपची विचारधारा मान्य नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

भाजप आणि काही अपक्ष संपर्कात असल्याचा प्रश्नावर सतेज पाटील यांनी विरोधी पक्ष आम्हाला आमदार सांभाळा म्हणत असेल तर त्यांनी त्यांचे आमदार सांभाळावेत. आमच्या सोबत कोण आहे हे दहा तारखेला स्पष्ट होईलच, असे सूचक वक्तव्य केले.

दरम्यान, राज्यात तब्बल २४ वर्षानंतर होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात प्रतिष्ठेची आणि चुरशीची लढत होणार आहे. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर, सहा जागांसाठी शिवसेनेनं दोन, काँग्रेसनं एक, राष्ट्रवादीनं एक आणि भाजपनं तीन उमेदवार असे सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

प्रसिद्ध गायक नंदेश उमप निवडणुकीच्या रिंगणात

Devendra Fadnavis : कार्यकर्त्यांची नाराजी अनेकवेळा असते, आम्ही सगळे मिळून ती नाराजी दूर करु

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा; कांद्यावरील निर्यातबंदी हटवली

नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात; राज ठाकरेंची आज कणकवलीत सभा

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य