Imtiyaz Jalil
Imtiyaz Jalil  Team Lokshahi
राजकारण

राज्यातील नेते गलिच्छ राजकीय भांडणात व्यस्त, जलीलांची टीका

Published by : Sagar Pradhan

वेंदाता-फाॅक्सकाॅन हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्याच्या राजकारणात जोरदार वादंग सध्या सुरु आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि विद्यमान शिंदे- फडणवीस सरकारमध्ये गंभीर आरोप- प्रत्यारोप सुरु असताना या वादात आता औरंगाबाद एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी उडी घेतली आहे. राज्यातील नेते गलिच्छ राजकीय भांडणात व्यस्त असल्याने ते बेरोजगारांची काळजी का करतील? अश्या शब्दात खासदार जलील यांनी दोन्ही सरकारला टोला लगावला आहे.

यापुर्वी देखील आमचा प्रकल्प हिसकावण्यात आला

इम्तियाज यांनी दोन्ही सरकारवर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, वेदांता हा केवळ महाराष्ट्राकडून हिसकावलेला एकमेव प्रकल्प नाही, यापुर्वी देखील आमचा किया मोटार्स हा प्रकल्प हिसकावण्यात आला होता. राज्याचे नेते गलिच्छ राजकीय भांडणात व्यस्त असताना ते आमच्या बेरोजगार तरुणांची काळजी का करतील? इच्छाशक्तीचा अभाव राज्याच्या विकासाची गती मंदावत आहे.यापूर्वी महाउद्योग मंत्री सुभाष देसाई औरंगाबादचे पालकमंत्री होते. त्यांना एकही उद्योग इथे आणता आला नाही. प्रत्येक वेळी इतके हजार कोटींचे सामंजस्य करार केल्याचे सांगून त्यांनी लोकांना मूर्ख बनवले. असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

इतर राज्यांचा विकास

दुसऱ्या ट्विट मध्ये त्यांनी लिहले की, वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्क सारखे महाराष्ट्रासाठी रोजगार देणारे प्रकल्प गुजरात, हिमाचल आणि आंध्र प्रदेशात स्थलांतरित करण्यात आले. हे सरकार विकासावर भर देणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले, त्यांचा अर्थ इतर राज्यांचा विकास असा आहे हे आम्हाला माहीत नव्हते, असा टोला जलील यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.

दिंडोरी लोकसभेतून अखेर जे पी गावित यांची माघार; म्हणाले...

Sadabhau Khot : महाविकास आघाडी ही भरकटलेली आघाडी आहे

LSG VS KKR: लखनौचा दुसऱ्यांदा पराभव; कोलकाता नाईट रायडर्स 98 धावांनी दमदार विजयी

Sanjay Raut: 'नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा' राऊतांचा आरोप

रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे मैदानात