राजकारण

मोठी बातमी! वंचित आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश; अधिकृत पत्र जारी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये अखेर प्रवेश झाला आहे. महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचं पत्रही मविआने जारी केले असून यावर ठाकरे गट, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची सही आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये जागावाटपा संदर्भात पुढील चर्चा होण्याची शक्यता आहे.

काय आहे महाविकास आघाडीचे पत्र?

देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत.

वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे. ३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे, असे पत्रात लिहीले आहे. यावर ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या सह्या आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विटद्वारे वंचित बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाल्याचे म्हंटले आहे. बाळासाहेब आंबेडकर हे 2 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील. वंचितमुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल, असे ट्विट राऊतांनी म्हंटले आहे.

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Daily Horoscope 17 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना साडेसातीचाही होणार त्रास; पाहा तुमचे भविष्य