राजकारण

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा-तसा वाटला का? - अजित पवार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा- तसा वाटला का? असा रोखठोक आणि संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज प्रदेश कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. याआधी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला त्यावर बोलताना अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले. ते म्हणाले, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्य करणे ताबडतोब थांबवावे. त्यांचे हे वक्तव्य निंदनीय असून त्यांचा निषेध करतो. लोकांचे लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरुन हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत. सध्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे काय माहित. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक शब्दात त्यांना सुनावले पाहिजे. आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले आहे, असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला.

केंद्राने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला. प्रत्येक राज्याचा अस्मितेचा प्रश्न असतो. अनेक मुख्यमंत्र्यांनी राज्याला एकसंघ ठेवण्याचा काम केले आहे. आता काहीही कारण नसताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका मांडली पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगितल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे. असे त्यांनी ट्विट केलं आहे. तसेच ते म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केले असून त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असं बोम्मई यांनी म्हटले आहे.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी सातारा जिल्ह्यात जनजागृती पथक

Rohit Pawar On Tanaji Sawant: रोहित पवारांचा तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल; ट्विट करत म्हणाले की...

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

DC VS RR: संजू सॅमसनची 86 धावांची खेळी व्यर्थ! दिल्ली कॅपिटल्सचा 20 धावांनी विजय

छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...