dhananjay mahadik, piyush goyal anil bonde
dhananjay mahadik, piyush goyal anil bonde Team Lokshahi
राजकारण

Shivsena X BJP : राज्यसभा निवडणुकीत चुरस वाढणार, भाजपकडून तिघांचे अर्ज दाखल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून (Shivsena) दोन उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आज उर्वरीत पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चा असतानाच भाजपने (BJP) मात्र तिसरा उमेदवारही रिंगणात उभा केला आहे. यामुळे शिवसेना व भाजपची थेट लढत रंगणार यात शंका नाही.

संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. यानुसार भाजपने पियुष गोयल (PIyush Goyal) आणि अनिल बोंडे (Anil Bonde) यांना रविवारी उमेदवारी घोषित केली. यासोबतच शिवसेनेची कोंडी करण्यासाठी धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांच्या रुपाने तिसरा उमेदवारही भाजपने निवडणुकीत उभा केला आहे. या पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, भाजपचे विधानसभेतील संख्याबळ पाहता दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजप तिसरी लढवेल आणि जिंकेलही, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण