Maharashtra Assembly Speaker Election
Maharashtra Assembly Speaker Election  Team Lokshahi
राजकारण

Maharashtra Assembly Speaker Election : अजित पवारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह; विधीमंडळाच्या कामकाजात होणार सहभागी

Published by : shamal ghanekar

आज (11वाजता) विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये भाजपाकडून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आणि महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी (Rajan Salvi) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच यादरम्यान शिवसेनेने प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे.

२७ जून रोजी अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. पण आता अजित पवारांची (Ajit Pawar) कोरोना चाचणीचा अवहाल निगेटिव्ह आल्याने ते विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये सहभागी होणार आहेत.

या निवडणुकीमध्ये मतदानासाठी शिवसेनेने ‘व्हीप’ जारी केला आहे. तसेच प्रत्येक पक्षाचा व्हीप हा त्या पक्षाच्या आमदारांसाठी बंधनकारक असणार असून ‘व्हिप’चे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास म्हणजेच मतदानास गैरहजर राहिल्यास आणि ‘व्हिप’च्या विरोधात उल्लंघन केले तर त्या आमदारावर अपात्रतेची कारवाई केली जाईल. त्यामुळे त्याची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल