राजकारण

मविआचे जागावाटप पुढील आठवड्यात होण्याची शक्यता; काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांच्या उपस्थितीत झाली बैठक

Published by : Siddhi Naringrekar

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते तसेच वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात तसेच, राहुल गांधींच्या आगामी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या आयोजनावर चर्चा झाली.

यासोबतच राज्यात मविआचे जागावाटप पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. ‘इंडिया’तील जागावाटपाच्या सूत्रामध्ये राज्या-राज्यांमध्ये काँग्रेसला अपेक्षित जागांचा आकडा प्रदेश काँग्रेस नेत्यांनी हायकमांडकडे सादर केलाय. त्यानुसार महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या जागावाटपाबाबत पुढील आठवड्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यामध्ये काँग्रेस किती जागांवर दावा केला पाहिजे, या संदर्भात खरगे व राहुल गांधी यांच्याकडे मत मांडल्याची माहिती मिळत आहे.

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

Daily Horoscope 21 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 21 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"मोदी पराभवाच्या भीतीमुळं निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतात"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

IPL 2024 Play Offs : प्ले ऑफचा सामना पावसामुळं रद्द झाल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती