Raj Thackeray
Raj Thackeray  Team Lokshahi
राजकारण

'मी ट्रेलर, टीझर टाकणार नाही, थेट पिक्चर २२ तारखेला शिवाजी पार्कवर दाखवणार'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : सध्याची राजकीय परिस्थिती बघता राज्यातील मतदारांना काही व्हॅल्यू आहे, असं वाटत नाही. आज याच्याशी झिम्मा, त्याच्याशी फुगडी हेच चाललंय. यावर मला ट्रेलर, टीझर टाकायचा नाही. थेट पिक्चर २२ तारखेला शिवाजी पार्कवर दाखवणार, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटले आहे. मनसेच्या पाडव्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे. दरम्यान, मराठी दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांची अमोल परचुरे यांनी मुलाखत घेतली.

मी लहान असतानाच आजोबा गेले, त्यामुळे त्यांचे वाचनसंस्कार झाले नाही. त्यानंतर मी वाचनास सुरुवात केली. संस्कार काय लगेच देण्यासारखी गोष्ट नाही, तो आपण घ्यायचा असतो. मी चेहरे वाचतो, कोण बरोबर राहणार आहे कोण जाणार आहे हे आधीच कळतं. मी झेपेल तेवढेच वाचतो, असा अप्रत्यक्ष टोला राज ठाकरेंनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे. फिक्शन किंवा लव्हस्टोरी मी वाचत नाही. मला इंदिरा गांधीचे, सावरकर, हिटलर, आंबेडकर यांच्यावरील चांगले पुस्तक वाचायला आवडतात.

हल्ली आपल्याकडे कुणीही इतिहासावर बोलायला लागले. व्यक्ती समजून न घेता त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथी करायची आणि जुन्या गोष्टी उकरुन वाद करायचे. आपल्याकडे स्मारक म्हणजे पुतळे आहे. वर्षभर कुणीही ढुंकूनही बघत नाही. महाराजांचे गडकिल्ले हे महाराजांचे स्मारक आहे. माझी इच्छा होती की जर इंदूमिलमध्ये बाबासाहेबांचे स्मारक बांधायचे होते तर त्याठिकाणी जगातील भव्य लायब्ररी व्हायला हवी होती, अशी सुप्त इच्छा त्यांनी बोलून दाखवली.

सध्याची राजकीय परिस्थिती बघता राज्यातील मतदारांना काही व्हॅल्यू आहे, असं वाटत नाही. आज याच्याशी झिम्मा, त्याच्याशी फुगडी हेच चाललंय. म्हातारी मेल्याचे दुख नाही, मात्र काळ सोकावता कामा नये. सध्या महाराष्ट्रात जे काही चालू आहे त्यावर मी सविस्तर २२ तारखेला शिवाजी पार्कवर बोलणार आहे. मला ट्रेलर, टीझर टाकायचा नाही. थेट पिक्चर २२ तारखेला शिवाजी पार्कवर दाखवतो, असे राज ठाकरेंनी म्हंटले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला. मी बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अणावरणासाठी गेलो होतो, मला कळतच नव्हत कोण कुठला आमदार आहे, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या रमेश जाधवांचा उमेदवारी अर्ज दाखल