adesh bandekar
adesh bandekar Team Lokshahi
राजकारण

मनाची थोडी लाज उरली असेल तर...; मनसेची बांदेकरांना विनंती

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : आराध्य दैवत सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासामध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप वारंवार मनसे नेते यशवंत किल्लेदार आणि मनोज चव्हाण करत आहेत. यावरुन आदेश बांदेकरांवरही मनसेने जोरदार टीका केली आहे. विधिमंडळात त्यांचा हा मुद्दा उपस्थित केला गेला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतरही यशवंत किल्लेदार यांनी ट्विट करत बांदेकरांवर टीकास्त्र सोडले आहे.

यशवंत किल्लेदार यांनी ट्विटरवरुन आदेश बांदेकरांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, बांदेकर एक विनंती आहे. जर मनाची थोडी जरी लाज उरली असेल तर आजपासून नववर्षाच्या पहिल्या दिवशी सिद्धिविनायक मंदिरात किमान चौकशी पुर्ण होईपर्यंत मंदिरात जाऊ नका. अजुन कलंकित नका होऊ. चौकशी पुर्ण होईपर्यंत तरी आवरा स्वतःला, मनमानी कारभार आज तिथे येऊन मिरवणे बंद करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, आदेश बांदेकरांवर गंभीर आरोप मनसेने केले आहेत. आदेश बांदेकर हे सगळं मातोश्रीला खुश करण्यासाठी करत आहेत असा देखील आरोप यशवंत किल्लेदार यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन केले. राज्य सरकारला त्यांनी चौकशीची विनंती त्यांनी केली होती. मधल्या काळात यशवंत किल्लेदार यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरामध्ये आंदोलन देखील केलं होतं.

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका

'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठिशी' प्रकाश शेंडगे यांची टीका