nana patole  | narendra modi
nana patole | narendra modi  Team Lokshahi
राजकारण

मोदी ओबीसी नाहीत, लवकरच पुरावे देऊ; पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

Published by : Sagar Pradhan

राज्यात राजकीय संघर्ष दिवसांदिवस वाढत चालला असताना, अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोले हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, मोदी हे ओबीसी नाहीत, त्याचे लवकरच पुरावे देऊ असा गंभीर आरोप पंतप्रधानांवर त्यांनी यावेळी केला.

काय म्हणाले नेमकं पटोले?

पुण्यात बोलत असताना ओबीसी राजकीय आरक्षण विषयावर बोलत असताना मोठे वक्तव्य केले आहे. त्यावेळी ते म्हणाले की, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाने आडनावावरुन माहिती संग्रहित केली होती. मात्र आडनावावरुन जात समजत नाही. एकाच आडनावाचे लोक अनेक जातींमध्ये असू शकतात. त्यामुळेच मोदी हे ओबीसी नाहीत. त्यासंदर्भातील सगळे पुरावेदेखील आमच्याकडे आहेत. हे पुरावे लवकरच जनतेपुढे आणू, असे त्यांनी बोलताना सांगितले.

सध्याचे मुख्यमंत्री नाचगाण्यात व्यस्त - पटोले

फॉक्सकॉन प्रकल्पवरून भाजपवर टीका करताना पटोले म्हणाले की, "फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेणारे सगळे मोदी आणि शाहांचे हस्तक आहेत. त्यांना महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातील तरुण जनतेचं काहीही देणंघेणं नाही. मुख्यमंत्र्यांबाबत काही न बोललेलंच बरं. सध्याचे मुख्यमंत्री नाचगाण्यात व्यस्त आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यांनी काय काय गुजरातला नेलं याची यादी द्यावी. मात्र तेच फडणवीस महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेण्याच्या गोष्टी करतात. अशी जोरदार टीका पटोले यांनी भाजप आणि फडणवीसांवर केली आहे.

Teacher Constituency Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर,कोण मारणार बाजी?

India Post Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? भारतीय डाक विभागात 'या' पदासाठी भरती प्रक्रिया चालू...

"महाराष्ट्रात ५० वर्ष आत्मा फिरतोय", नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर शरद पवारांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, "अब तक ५६..."

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना अंतरिम दिलासा नाहीच

Mumbai Water Supply : मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट तूर्तास टळलं, पाणी जपून वापरण्याचे आवाहन