राजकारण

सरसकट कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही; नारायण राणेंचे विधान

मनोज जरांगे पाटलांनी सरसकट आरक्षणाची मागणी केली असून सरकारला एका महिन्याचा वेळ दिला आहे. यावर आता नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी भूमिका मांडली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी आज 17 दिवसानंतर उपोषण सोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उपोषण मागे घेण्यात आले. तत्पुर्वी, मनोज जरांगे पाटलांनी सरसकट आरक्षणाची मागणी केली असून सरकारला एका महिन्याचा वेळ दिला आहे. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.

नारायण राणे म्हणाले की, मराठा आरक्षणाची मागणी ही अनेक वर्षांपासूनची आहे. त्याआधी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आलं मात्र कोर्टमध्ये ते टिकलं नाही. मात्र, आता मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी आहे. परंतु, सरसकट असं करु नका. हा निर्णय घेताना राज्य सरकारने घटनेतील कलम १५ चा अभ्यास करावा.

सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले मराठा समाजाचे लोकांना आरक्षण द्यावं. सरसकट कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही, असे मत त्यांनी मांडले आहे.

महाराष्ट्रात ३८ टक्के मराठा समाज गरीब आहे. अशांना आरक्षण दिले गेले पाहिजे. मात्र कुणाचंही आरक्षण काढून त्यांना द्यावे, अशा मताचा मी नाही. तरी घटनेतील तरतुदीप्रमाणे आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे, असेही नारायण राणेंनी म्हंटलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dickie Bird : प्रसिद्ध अंपायर डिकी बर्ड यांचे निधन

Latest Marathi News Update live : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज सोलापूर, धाराशिव, बीड दौरा

Maharashtra Weather Update : 'या' तारखेपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत-चीनवर गंभीर आरोप, म्हणाले...