Eknath Khadse
Eknath Khadse  Team Lokshahi
राजकारण

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे संपर्क क्षेत्राच्या बाहेर? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

Published by : Sagar Pradhan

मंगेश जोशी। जळगाव: राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती समोर येत असून एकनाथ खडसे नेमके कुठे आहेत याबाबत आता कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना व राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असताना अचानक एकनाथ खडसे हे नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

एकनाथ खडसे मुंबईत ?

एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला असून आठ दिवसापूर्वी एकनाथ खडसे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात मुंबई ला गेले होते. दरम्यान त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क देखील झाला होता मात्र गेल्या पाच ते सहा दिवसापासून एकनाथ खडसे यांचा मोबाईल बंद असल्याने कार्यकर्त्यांशी देखील त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

राष्ट्रवादीमध्येही एकनाथ खडसे नाराज ?

2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट न देता त्यांची कन्या रोहिणी घडसे यांना उमेदवारी दिली होती मात्र आपल्या कन्येच्या पराभवासाठी जिल्ह्यातीलच काही भाजप नेत्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता व त्यानंतर एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये खडसेंना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा देखील रंगली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना विधान परिषदेत स्थान देण्यात आले. मात्र राष्ट्रवादीतही फार मोठी संधी न मिळाल्याने खडसे नाराज असल्याचे बोलले जात आहे.

कायम पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या संपर्कात असणारे एकनाथ खडसे हे अचानक संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्याची ही पहिलीच वेळ असून एकता खडसे यांचे दोनही मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण