Eknath Khadse | Girish Mahajan
Eknath Khadse | Girish Mahajan Team Lokshahi
राजकारण

गिरीश महाजन मुख्यमंत्री बनले तर माझा पाठिंबा; कट्टर राजकीय विरोधक एकनाथ खडसेंचे विधान

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात वाद सुरू आहे. आणि तो वाद वेळोवेळो सर्वांसमोर देखील येतो. त्यातच हे आरोप- प्रत्यारोपाचे सत्र सुरु असताना अशातच आता गिरीश महाजनांचे कट्टर राजकीय विरोधक एकनाथ खडसे यांनी त्याच्याबद्दल मोठे विधान केले आहे. जळगावमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

सुरेश दादा जैन हे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. मला जो मुख्यमंत्री पाहिजे, तो कार्यक्षम, चांगला, दूरदृष्टी आणि सामाजिक हित जपणारा पाहिजे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने त्याने केलेल्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला, तर त्यांचं स्थान वरचं असलं पाहिजे. अशा निकषांमध्ये बसणारा माणूस मला मुख्यमंत्री म्हणून पाहिजे. या निकषांमध्ये गिरीश महाजन बसत असतील, तर मला काहीही अडचण नाही. या भागातील प्रकल्प मंजूर करण्यासाठी कुणीही तयार झाला, तर त्या व्यक्तीला माझा पाठिंबा आहे. असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, आपल्या परिसरात विद्यापीठ, पशुवैद्यकीय महाविद्यालय यासह सिंचनासाठी निधी मिळावा. खानदेशाच्या विकासासाठी पैसा मिळावा. आपला परिसर सुजलाम् सुफलाम् व्हावा, असं स्वप्न आम्ही वर्षानुवर्षे पाहत आलो आहोत. ज्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, ते प्रकल्प पूर्ण करावेत, अशी आमची अपेक्षा आहे. हे काम करणारा नेता माझा कितीही कट्टर शत्रू असला तरी मुख्यमंत्री पदासाठी माझा त्यांना पाठिंबा असेल. असे देखील खडसेंनी स्पष्ठपणे सांगितले.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा