राजकारण

सुशांत, दिशा व मनसुख हिरेन यांच्या नावाने नितेश राणेंचे सूचक ट्विट; म्हणाले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या गौरी भिडे यांना संरक्षण देण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी सूचक ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. या ट्विट मध्ये सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन आणि मनसुख हिरेन या तीन दिवंगत व्यक्तींच्या मृत्यूचा दाखलाही त्यांनी दिला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

बेहिशेबी मालमत्तेचा आरोप करत गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणाची बुधवारी न्यायमूर्ती एस गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी २ आठवड्यासाठी तहकूब करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ट्विटद्वारे ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, गौरी भिडे यांच्या जीवाचे रक्षण होणे महत्त्वाचे असून त्यांना महाराष्ट्र शासनाने संरक्षण देण्याची गरज आहे. दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत आणि मनसुख हिरेन यांच्याबाबत काय झाले ते आम्हाला माहिती आहे, असे सूचक ट्विट त्यांनी केले आहे. या तिन्ही मृत्यूंवरून शिवसेना व शिवसेना नेत्यांवर याआधी गंभीर आरोप झालेले आहेत. त्यामुळे गौरी भिडे यांच्या संरक्षणावरून आता नवा राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

काय आहे याचिकेत?

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उत्पन्नाचा व संपत्तीचा ताळमेळ लागत नाही. यामुळे याची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांची संपत्ती भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता आहे. याविरोधात ११ जुलै २०२२ ला मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून आम्ही तक्रारही केली आहे, असेही याचिकाकर्त्यांनी म्हंटले आहे.

...म्हणून मी पहाटे पोलीस ठाण्यात गेलो होतो; सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण

Rahul Narwekar : 'यामिनी जाधव यांना खरंच मदत झाली का?' काय म्हणाले राहुल नार्वेकर

Lok Sabha Election 2024: एकाच तरुणानं केलं चक्क 8 वेळा मतदान; व्हिडीओ व्हायरल...

माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी केले अनोखे आंदोलन

Daily Horoscope 22 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडणार; पाहा तुमचे भविष्य