राजकारण

अफजल खानाची कबर पर्यटकांसाठी खुली करा; उदयनराजेंची शिंदे सरकारकडे मागणी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

प्रशांत जगताप | सातारा : शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मोठी कारवाई करत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळील अतिक्रमण पाडले आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. तर, खासदार उदयनराजे भोसले यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. तसेच, प्रतापगडावरील कबर पर्यटकांसाठी खुली करा, अशी मागणीही शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे.

प्रतापगडावरील अफजल खानाची कबर पर्यटकांसाठी खुली करा. भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कळला पाहिजे. मुस्लिम समाजाने गैरसमज करून घेऊ नये. या गोष्टीला राजकीय स्वरूप देणं उचित नाही.अतिक्रमण काढून जे केलं ते योग्यच केलं असल्याचे सांगत उदयनराजे भोसले यांनी सरकारला कबर खुली करण्याचे आवाहन केलं आहे.

तर, छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार इंग्लंड येथून परत आणण्याचा मानस सरकारचा असल्याचा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल सांगितले. यावर इंग्लंड येथील जगदंब तलवार ही ऐतिहासिक ठेवा असून ब्रिटिश सरकारने मोठं मन दाखवून ती परत केली पाहिजे, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. जलमंदिर पॅलेस येथे जाऊन बावनकुळेंनी भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली आहे. यावेळी माथाडी नेते अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यासह भाजपचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...