राजकारण

पंकजा मुंडेंना मोठा धक्का! बाजार समितीत भाजपचा सुपडा साफ; राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

Published by : Shweta Shigvan-Kavankar

विकास माने | बीड : बीड जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. दरम्यान वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आज हाती आला. या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना मोठा पराभव स्वीकारावा लागलाय. तर राष्ट्रवादीने बाजार समितीवर एक हाती वर्चस्व निर्माण केलंय.

जिल्ह्यातील 8 बाजार समितीमध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. यातील वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती लागला असून राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती वर्चस्व निर्माण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास महाआघाडीचे 18 पैकी 18 सदस्य निवडून आले आहेत.

तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ मुंडे यांच्या शेतकरी विकास पॅनलचा सुपडा साफ झाला आहे. यानंतर राष्ट्रवादीने एकच जल्लोष केलेला पाहायला मिळाला. यापूर्वी नगरपंचायत निवडणुकीत देखील पंकजा मुंडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे वर्चस्व येथे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आज परळीची देखील मतदान प्रक्रिया पार पडली असून याचा निकाल उद्या हाती येणार आहे

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ

Wedding Rituals: हिंदू धर्मात लग्नाच्या वेळेस का केली जाते सप्तपदी? जाणून घ्या कारण...

Wedding Rituals: लग्नात का चोरतात नवरदेवाचे बूट? रंजक आहे यामागचं कारण

"त्या पदावरून शरद पवार बाजूला गेले आणि..." बारामतीच्या सभेत अजित पवारांनी सांगितला मोठा किस्सा