राजकारण

...तर शिवसेना अन् राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगेल : प्रकाश आंबेडकर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानं आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रद्रोही विधाने या मुद्द्यांवर महाविकास आघाडीने महामोर्चा आज काढला आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महामोर्चातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भूमिका वेगवेगळी असल्याने दोघांत कलगीतुरा रंगण्याची शक्यता वर्तवली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीचा मोर्चा राज्यपालांनी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आहे. तर, राष्ट्रवादीची भूमिका ही सीमावाद प्रश्नी आहे. त्यामुळे दोघांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. सेना ही छत्रपतीवरील वक्तव्याप्रकरणी राज्यपाल यांना हटवा या भूमिकेवर ठाम आहे. तर, राष्ट्रवादी सीमा प्रश्नी बोलणार आहे. अस झालं तर कलगीतुरा रंगला, अस मला वाटेलं, असे त्यांनी म्हंटले आहे. तर, महाविकास आघाडीच्या महामोर्चात सहभागी होणार का, असा प्रश्न विचारला असता आम्ही महाविकास आघाडीचा भाग नाही, असे उत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या 'शिवशक्ती-भिमशक्ती'च्या युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच मुंबईतील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर आले. या कार्यक्रमात दोघांनीही भविष्यातील राजकीय मैत्रीचे संकेत दिले होते. कॉंग्रेसने आम्हाला कायम चेपले, शिवसेना आता सोबत येत आहे. कॉंग्रेसच्या सोबत कायमच भांड्याला भांड लागलं आहे. यामुळे उद्धव ठाकरेंनी कोणासोबत जायचं ते त्यांनी ठरवावं, बॉल आता त्यांच्या कोर्टात आहे, असे त्यांनी म्हंटले होते.

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं