Raj Thackeray
Raj Thackeray Team Lokshahi
राजकारण

राज ठाकरे पुणे दौऱ्यापूर्वी जाणार शिर्डी-नाशिक दौऱ्यावर

Published by : Vikrant Shinde

अमोल धर्माधिकारी | पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सक्रिय झालेले पाहायला मिळतायत. त्यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीला जोरदार सुरूवात केली आहे. विदर्भ दौरा पुर्ण झाल्यानंतर आता ते शिर्डी व नाशिकचा दौरा करणार आहेत. 4, 5 व 6 तारखेला ते पुण्याला जाणार आहेत मात्र, त्यापुर्वी 1 व 2 तारखेला ते शिर्डी व नाशिकमध्ये असणार आहेत.

कसा असेल दौरा?

  • सकाळी आठ वाजता शिर्डी विमानतळावर पोहचणार राज ठाकरे

  • शिर्डी विमानतळावर राज ठाकरे यांचं मनसे करणार जंगी स्वागत

  • साई मंदिरात जाऊन घेणार साई बाबांच दर्शन

  • साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे नाशिक मध्ये जाणार

  • २ ऑक्टोंबर ला सकाळी सात वाजता वणीच्या सप्तशृंगी देवीचं दर्शन घेणार

मनसेसाठी नाशिक महत्त्वाचं:

नाशिक हे एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणुन ओळखलं जात होतं. नाशिक पालिकेवर मनसेचा झेंडा फडकला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी नाशिककडे लक्ष केंद्रित केलं होतं. मात्र, त्यानंतर नाशिकमध्ये मनसेला फारसं यश मिळवता आलं नाही. परंतु, आता राज ठाकरे नव्या उमेदीने महाराष्ट्रभर दौरे करणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्येही मनसे कात टाकून पुन्हा नव्या रंगात अन् नव्या ढंगात दिसणार का हे पाहणं गरजेचं आहे.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...