राजकारण

महात्मा गांधींचा जातीभेदावर विश्वास होता; रणजीत सावरकरांचा मोठा आरोप

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात सध्या वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरु आहे. अशातच वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. स्वातंत्रवीर सावरकर जेव्हा समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते, तेव्हा गांधीजी चातुर्वर्णाच्या बाजूने होते. गांधींचा जातीभेदावर विश्वास होता, असा मोठा आरोप रणजीत सावरकर यांनी केला आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते. रणजीत सावरकारांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

रणजीत सावरकर म्हणाले की, स्वातंत्रवीर सावरकर जेव्हा समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते. तेव्हा गांधी चातुर्वर्णाच्या बाजूने होते. गांधींचा जातीभेदावर विश्वास होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही गांधींच्या विचारांबाबत टीका केली होती, असा दावा त्यांनी केली आहे. ब्रिटीशांविरुद्ध कोणतेही आंदोलन करायचे नाही, अशी अधिकृत भूमिका काँग्रेसने घेतली होती. १२ फेब्रुवारी १९२२ रोजी काँग्रेस कार्यकारिणीचा तसा ठराव आहे. त्याची कागदपत्रं आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

सावरकरांच्या कथीत माफीनाम्यासंदर्भातही बोलताना ते म्हणाले, सावरकरांनी कधीही माफी मागितली नाही. सावरकरांनी १९१३ ब्रिटीशांकडे पहिला अर्ज केला होता. तो सुटका करावी यासाठी नव्हता. ब्रिटीशांच्या नियमाप्रमाणे सहा महिने प्रत्येक कैद्याला कोठडीत ठेवण्यात येत होते आणि उर्वरित सहा महिने त्यांना जेल परिसरात ठेवण्यात येत होते. स्वतंत्र आणि बंदीवान अशी त्यावेळी पद्धत होती. मात्र, क्रांतीकारकांना तीन-तीन वर्ष कोठडीतून बाहेर काढण्यात येत नव्हते. त्यामुळे त्यांनी पत्र ब्रिटीशांना पत्र लिहिले होते, त्याला आपण माफीनामा कसा म्हणू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राजकीय वर्तुळात वाद उभा राहिला होता. अशात वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली होती. तर, महात्मा गांधी व कॉंग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...