Sanjay Raut
Sanjay Raut  Team Lokshahi
राजकारण

राज्यात राऊतांची तोफ धडाडणार? उद्या होणार हायकोर्टात सुनावणी

Published by : Sagar Pradhan

मागील अनेक महिन्यांपासून संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कोठडीत होते. कोर्टाकडून अनेक वेळा त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. मात्र, आता राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 100 दिवसानंतर संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. त्यानंतर ईडीने कोर्टाच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, संजय राऊत यांचे आज बाहेर येणे अटळ झाले आहे. कारण ईडीची याचिकेवर हायकोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी 31 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. त्यांच्या कुटुंबीयांशिवाय त्यांना कुणालाही भेटू दिले जात नव्हते. मध्यंतरीच्या काळात राऊत यांच्या वतीने जामिनासाठी कोर्टात वारंवार अर्जही करण्यात आले. पण त्यांना जामीन मंजूर झाला नव्हता. मात्र, आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे शिवसेनेतून आनंद व्यक्त केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

पत्राचाळ येथे म्हाडाचा भुखंड होता. हा भुखंड विकसित करण्यासाठी आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिले होते. पण त्यांनी ही जागा परस्पर खाजगी विकासकांना विकली. पत्राचाळमधील 672 रहिवाशींना 650 स्केअर फुटाचे घर देण्यात येणार होते. त्यांच्या या सोसायटीत अनेक अॅनिमिटी देण्यात येणार होत्या. रहिवाशांना 25 कोटी रुपये कार्पस फंड देण्यात येणार होते. त्यातून रहिवाश्यांचे मासिक मेंटेनेंस भरला जाणार होते. याप्रकरणी ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात पत्राचाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे.

"हे मोदी सरकार नव्हे, हे तर गजनी सरकार"; उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'

"कुणी भारताला थप्पड मारली, तर त्याचा जबडा तोडण्याची हिंम्मत आजच्या भारताकडे आहे", सोलापूरात योगी आदित्यनाथ कडाडले

"देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदीच जबाबदार", मविआच्या सभेत शरद पवारांचा महायुतीवर घणाघात

"नरेंद्र मोदींचं काम पाहून राज ठाकरेंनी..."; शिवतीर्थावर ठाकरेंची भेट घेतल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

"...तर सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेश म्हस्केंचं मोठं विधान