राजकारण

ऋतुजा लटकेंचा राजीनामा नामंजूर; पालिकेविरोधात आता उच्च न्यायालयात धाव

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अंधेरी-पूर्व मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा राजीनामा आज महापालिकेकडून फेटाळण्यात आला आहे. यामुळे उध्दव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. महापालिकेविरोधात ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अंधेरी-पूर्व मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी दिली होती. शासकीय नोकरीचा राजीनामा दिल्याशिवाय कोणतीही निडणूक लढवता येत नाही. यानुसार त्यांनी राजीनामा, एका महिन्याचे वेतन पालिकेच्या कोषागारात जमा केलेले आहे. मात्र अजूनही प्रशासनाने हा राजीनामा मंजूर केलेला नाही.

यातच ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी पालिका प्रशासनाला राजीनामा मंजूर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्याच तातडीने सुनावणी होणार आहे. न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आहे. ऋतुजा लटके यांच्या बाजूने अॅड. विश्वजित सावंत न्यायालयीन लढाई लढणार आहेत, अशीही माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

तर, ऋतुजा लटके यांना शिंदे गट आमिष देत आहेत. मंत्री पद देतो असं आमिष देत आहेत. जाणीवपूर्वक ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही. आमचे सगळे प्लॅन तयार आहेत. वेळ आल्यावर कळेल, असेही अनिल परब यांनी सांगितले आहे.

इंडिया आघाडीची 'या' दिवशी होणार मुंबईत प्रचारसभा

अमरावती महानगरपालिकाचे कर्मचारी आजपासून संपावर

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 14वर; 43 जणांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना