Rutuja Latke met Uddhav Thackeray with Anil Parab
Rutuja Latke met Uddhav Thackeray with Anil Parab Team Lokshahi
राजकारण

ऋतुजा लटकेंनी घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट

Published by : Vikrant Shinde

गिरीश कांबळे | मुंबई: स्वर्गीय आमदार रमेश लटके यांच्या अंधेरी पुर्व मतदार संघात लागलेल्या पोटनिवडणूकीची सध्या संपुर्ण राज्यभर चर्चा आहे. याचं कारण म्हणजे 'शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे' या पक्षाने स्वर्गीय आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचं जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या 'बाळासाहेबांची शिवसेना' या पक्षाने पक्षचिन्ह व पक्षनावाबाबत न्यायालयात घेतलेली धाव व त्यानंतर ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबद्दलचं रणकंद.

आज न्यायालयाने मुंबई महापालिकेला लटकेंचा राजीनामा स्विकारण्याचे आदेश दिल्यामुळे ऋतुजा लटके यांच्यसह उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. तर, उद्या सकाळी 11 वाजोपर्यंत त्यांचा स्विकारलेला राजीनामा त्यांच्या हातात मिळणार आहे व त्यानंतर उद्याच त्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

आज हायकोर्टाच्या निकालानंतर ऋतुजा लटके यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अनिल परब देखील उपस्थित होते.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार