राजकारण

'जो हा अपमान सहन करताहेत, ते गां**ची अवलाद', संजय राऊत संतापले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागील काही दिवसांपासून आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हे शांत होत असतानाच पुन्हा एकदा राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर काही महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला आहे. यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, भगतसिंग कोश्यारी यांनी एकेरी उल्लेख केलेला आहे. आम्ही यावरील लढतच आहोत. सरकारमध्ये ज्यांनी फेविकॉल लावून बसलेले आहेत. ते सगळे विषयावरती बोलत आहेत. फक्त शिवाजी महाराजांच्या अपमानावरती बोलत नाही. आम्हाला असं वाटलं होतं की केंद्रातला एखादा मंत्री आहे तो राजीनामा देईल आणि महाराष्ट्रात परत येईल. जो हा अपमान सहन करत आहे तर ते गांडूची अवलाद आहेत.

काय म्हणाले राज्यपाल?

राज्यपाल कोश्यारी यांनी आज राजभवनातील कार्यक्रमात भाषण केलं. आपल्या भाषणात कोश्यारी हिंदी भाषेत म्हणाले, आज सब कहते है, शिवाजी होने चाहिए, चंद्रशेखर होने चाहिए, भगतसिंह होने चाहिए, नेताजी होने चाहिए. लेकीन मेरे घर में नही, दुसरों के घर में होने चाहिए, असे त्यांनी म्हंटले आहे.

'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांच जीवनचरित्र

Varsha Gaikwad : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे आता मैदानात

वंचितच्या रमेश बारसकर यांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले...

Tanaji Sawant : आमचा महायुतीचा उमेदवार 2 लाख मतांनी निवडणूक येणार