राजकारण

सावरकरांना भारतरत्न खिताब का दिला नाही? ढोंगी प्रेम दाखवू नका :संजय राऊत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकारांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकारण तापले आहे. यावरुन भाजप-शिंदे गटाकडून शिवसेना व राहुल गांधींवर टीका केली जात आहे. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सावरकरांना भारतरत्न खिताब का देण्यात आलेला नाही? सावरकरांवर ढोंगी प्रेम दाखवू नका, असे शिंदे गट- भाजपला सुनावले आहे.

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेबांचे स्मरण 10 वर्षांमध्ये क्षणोक्षणी राहिले आहे. देशात आणि राज्यात जे काम केले त्यामुळे नागरिकांनाही ते स्मरण राहिले आहे. शिवसेनेची स्थापना ही बाळासाहेबांच्या जीवनातील महत्वाची घटना. 50 वर्षापेक्षा जास्त शिवसेना अनेक घाव झेलून उभी आहे. बाळासाहेब असतानाही पाठीत घाव झाले आणि त्यानंतरही झाले. बाळासाहेब एक उत्तम व्यगंचित्रकार, वक्ते, नेते राज्याचे नव्हे तर देशातील जनतेची नाडी ओळखणारे नेते होते. आजही आम्ही त्यांचे विचार घेऊन पुढे जातो आहे. कोणी कितीही सांगितले तरी बाळासाहेबांच्या विचारांची मशाल ही फक्त निष्ठांवंताच्या हातात असते.

शिवसेनाप्रमुखांना जाऊन १० वर्षं झाली. त्यानंतर शिवसेना तोडण्याचा जो प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून झाला. ज्या पद्धतीने बाळासाहेब आमचे, त्यांचे विचार आमचे असं ते म्हणत आहेत, हे ढोंग आहे. बाळासाहेबांनी सतत ढोंगाचा तिरस्कार केला. ढोंगाला लाथ मारली पाहिजे असे ते म्हणायचे. दुर्दैवाने आज महाराष्ट्रात काही ढोंगी लोक आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असं सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. पण ती जनता पूर्णपणे बाळासाहेब ठाकरे यांच्याशीच निष्ठावान आहे, असा निशाणा त्यांनी शिंदे गटावर साधला आहे.

बाळासाहेब जर असते आणि अशा प्रकारचे कंबरेखालचे घाव झाले असते तर त्यांची अवस्था फार वाईट केली असती. बाळासाहेबांचे फटकारे, भूमिका, विचार यामुळे महाराष्ट्राला मजबुती मिळाली. बाळासाहेबांकडे पाहिलं तर आजही वाटतं की राज्याचं नेतृत्व किती खुजं झालं आहे. बाळासाहेबांच्या नावाने जे तोतये निर्माण होत आहेत. ते फार काळ टिकणार नाहीत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपाने शिवसेना आणि काँग्रेसवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, वीर सावरकरांनंतरचे एकमेव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. वीर सावरकरांना भारतरत्न द्या ना? आम्ही सातत्याने मागणी करत आहोत. हिंदुहृदयसम्राटांविषयी एवढंच प्रेम आहे तर बाळासाहेब ठाकरेंनाही सावरकरांच्या बरोबरीने भारतरत्न मिळायला हवा. अनेक राजकीय नेत्यांना स्वार्थासाठी भारतरत्न खिताब देण्यात आला आहे. पण बाळासाहेब ठाकरे आणि सावरकरांना भारतरत्न खिताब का देण्यात आलेला नाही?सावरकरांवर ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या ही मागील 15 वर्षांपासून शिवसेनेची मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा