राजकारण

तुरुंगात राहणं फारच कठीण; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत तुरुंगातून सुटल्यानंतर आज शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे व राष्ट्रवादीचे सर्वांसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तत्पुर्वी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोणतीही टीका न करता आज तीन महिन्यांनी हातात घड्याळ बांधले आहे, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी कोणावरही टीका-टीप्पणी न केल्याने राजकीय वर्तुळातून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

संजय राऊत म्हणाले की, आज तीन महिन्यांनी हातात घड्याळ बांधले आहे. तुरुंगातील यातना कुणाच्याही वाट्याला येऊ नये. तुरुंगात राहणं फारच कठीण असतं. तुरुंगात राहणे काही आनंदाची गोष्ट नाही. तुरुंगातील भिंतींसोबत बोलावे लागते. वीर सावरकर, लोकमान्य टिळक, अटल बिहारी वाजपेयी जेलमध्ये कसे राहीले असतील, याचा मी नेहमी करतो. मी आज आज मी उध्दव ठाकरेंना भेटणार आहे. तसेच, शरद पवारांनी फोन केला होता. त्यांना माझी काळजी आहे. त्यांनाही मी भेटणार आहे.

मी ईडीवर कोणतीही टीप्पणी करणार नाही. ज्यांनी कारस्थान रचली त्यांना आनंद मिळाला असेल तर मीही त्यांच्या आनंदात सहभागी आहे. माझी कोणाविषयीही तक्रार नाही. मी, माझ्या पक्षाने आणि माझ्या कुटुंबाने खूप काही सहन केले आहे. याप्रकराचे राजकारण देशाने आजवर बघितले नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी एकदा भाषणात सांगितले होते की, राऊतांना ईडीकडून अटक होईल. त्यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टीस करावी, असे म्हणत संजय राऊत पुढे म्हणाले, मला ईडीकडून अटक झाली. ती बेकायदेशीर होती, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. परंतु, राज्यामध्ये शत्रूंप्रती ते जेलमध्ये जावे, अशा भावना व्यक्त करु नये. पण, मी एकांतमधील वेळ सत्कारणी लावला, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवरून शिवसेना UBT-भाजप ट्विटर वॉर

निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार १० टक्के सवलत

Ravindra Waikar: उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रविंद्र वायकर आज अर्ज दाखल करणार, म्हणाले...

Eknath Shinde on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून मलाही मुख्यमंत्री पदाची ऑफर

Sanjay Raut : विश्वजीत कदम नक्कीच वाघ असतील, ते वाघ आहेत की नाहीत हे 4 जूनला कळेल