राजकारण

संजय राऊतांना दिलासा नाहीच; कोठडी पुन्हा वाढली

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांची आजही न्यायालयाकडून निराशा झालेली आहे. संजय राऊत यांचा जामीन नाकारला असून असून 17 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु, वेळेअभावी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज तहकूब करण्यात आली आहे. पुढील सुनावनी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आली आहे. यामुळे 7 दिवस संजय राऊत यांना कोठडीतच राहावे लागणार आहे.

दरम्यान, न्यायालयासमोर सादर होण्यापुर्वी संजय राऊतांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती. बहुदा हे नवे चिन्हचं शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. नावात काय आहे, खरी शिवसेना कुणाची हे सर्वांना माहित आहे. आमच्यात शिवसेनेचे स्पिरीट आहे. अंधेरी निवडणुकीपूर्वी धनुष्यबाण व नाव हे शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाराष्ट्रात सध्या संतापाचे वातावरण आहे, असेही राऊतांनी म्हंटले आहे.

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...

Uddhav Thackeray : 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण