राजकारण

लोकसभा-विधानसभा एकत्र? शिरसाटांचे मोठे विधान, आम्ही पूर्वीपासून तयारीला...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

छत्रपती संभाजी नगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशात, लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी महत्वपूर्ण संकेत दिले आहेत. लोकसभा-विधानसभा एकत्रित निवडणुका झाल्यास खर्च वाचेल. आम्ही निवडणुकांच्या पूर्वीपासून तयारीला लागलो, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. तर, यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही शरसंधान साधले आहे.

शिवसेना-भाजप युती असल्याने काहींच्या पोटात दुखत आहे. आमची युतीची जागा वाटप जाहीर केले जाईल. शिवसेनेच्या जागेवर भाजप तयारी करते हा गैरसमज आहे. भाजपच्या जागेवर आमचं पाठबळ व शिवसेनेच्या जागेवर भाजपचे पाठबळ असेल हे येणाऱ्या लोकसभेत दिसून येईल, असे संजय शिरसाट यांनी म्हंटले आहे.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कुरघोडी करत आहे. संजय राऊत यांचे राष्ट्रवादीच्या मांडीवर बसण्याचे मार्गक्रमण सुरु आहे. एक नंबरचा पक्ष ठरवण्याचा अधिकार शरद पवार यांना असून उद्धव ठाकरे गटाला जीर्ण केले आहे. अशात ठाकरे गटाचे विलनिकरण झालं तरी वावग वाटणार नाही, असा निशाण त्यांनी ठाकरे गटावर साधला आहे.

तर, महाविकास आघाडीतील सध्या भांडणाचे सत्र सुरू झाल आहे. त्यांची भांडण सोडता सोडता निवडणूक येईल. जागावाटपावरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नुरानी कुस्ती होणार आहे. यात उद्धव ठाकरे गट टाळ्या वाजवेल व संजय राऊत झेंडे फडकवणार, असा जोरदार टोलाही संजय शिरसाटांनी मविआला लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवल्याचा दावा विरोधक करत असून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. यावरही संजय शिरसाटांनी भाष्य केले आहे. कशावरही राजकारण करतात, राजकारण करण्याची पात्रता ठेवा. दलित समाजाला कुचलण्याचं काम यांनी केले आहे. या कार्यक्रमात मंत्री आणि मुख्यमंत्री यांचा संबंध नसतो. हा मूर्खपणा आहे. चिल्लर राजकारण करण्यापेक्षा झाडून कामाला लागा, असा सल्ला त्यांनी विरोधकांनी दिला आहे.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...