राजकारण

नाना पटोले व बाळासाहेब थोरातांमधील वाद विकोपाला; सत्यजित तांबे म्हणाले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नाशिक : शिवसेना फुटीनंतर आता कॉंग्रेसमध्ये नवा राजकीय अध्याय पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यावर आमदार सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला असल्याचे पत्रकारांनी सत्यजित तांबेंना विचारल्यानंतर त्याबाबत मला काहीच माहित नाही असं तांबे यांनी सांगितले आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यांवरती जर राजीनाम्याची वेळ येत असेल तर काँग्रेस पक्षाने याचा विचार करायला हवा. काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, सत्यजीत तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचा केक संगमनेरमध्ये कापला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार इंदौरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा आयोजन संगमनेर या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळेस सत्यजित तांबे हे उपस्थित होते व त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचा केक कापला आहे.

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका

'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठिशी' प्रकाश शेंडगे यांची टीका

Uddhav Thackeray : 'मोदींवर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईन, पण...', ठाकरेंचा PM मोदींना टोला