Subramanian Swamy | BJP | Eknath Shinde | Devendra Fadnavis
Subramanian Swamy | BJP | Eknath Shinde | Devendra Fadnavis  Team Lokshahi
राजकारण

शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक, सुब्रह्मण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच आज भाजपचे माजी खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत चर्चा करण्यासाठी आज, २४ डिसेंबरला पंढरपूरात दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांनी धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी बोलताना शिंदे- फडणवीस सरकारवर टीका करताना भाजपला घरचा आहेर दिला आहे.

नेमकं काय म्हणाले सुब्रह्मण्यम स्वामी?

पंढरपूरमध्ये बोलत असताना सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारबद्दलही भाष्य केलं आहे. महाराष्ट्रामधील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक आहे, त्यांचं प्रकरण न्यायालयत प्रलंबित आहे अशी टिप्पणी त्यांनी केली. तसेच ३७० कलम हटवण्यासाठी मी अमित शहा यांना मार्गदर्शन केलं असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान भाजपला त्यांच्याच पक्षातील बड्या नेत्याने घरचा आहेर दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

मोदी हिंदुत्ववादी नाहीत

पुढे बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी कोणते चर्च सरकारीकरण केले का? १९४७ नंतर चर्च आणि मशीदी ताब्यात घेतल्या नाहीत. मग हिंदूंनी कोणते पाप केले आहे? मोदी हिंदुत्ववादी नाहीत. त्यांनी उत्तराखंडमध्ये अनेक मंदिरांचे सरकारीकरण केले. न्यायालयात जाऊन ती मुक्त करणार. मी भाजपच्या जाहीरनाम्यानुसार काम करणार, पंतप्रधान मोदी तसे नाहीत असं म्हणत त्यांनी थेट मोदींवर टीका केली आहे.

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...

Naseem Khan: नसीम खान यांचा प्रचार समितीचा राजीनामा मागे