Uddhav Thackeray | Nana Patole
Uddhav Thackeray | Nana Patole Team Lokshahi
राजकारण

महाविकास आघाडीत होणार बिघाडी? कसब्यात काँग्रेसविरोधात शिवसेना रिंगणात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड जागा रिक्त झाल्या होत्या. या जागेवर आता पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढवण्यासाठी कॉंग्रेसने कंबर कसली असतानाच आता शिवसेनेनेही रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

कसबा पेठ जागा लढवणार असल्याचे कॉंग्रेसने आधीच जाहीर केले होते. तर, शिवसेना पिंपरी-चिंचवड जागेसाठी आग्रही होती. परंतु, कसबा विधानसभा पोट निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनाही उतरण्याची शक्यता आहे. कसबा पोटनिवडणूक लढवावी, अशी मागणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबात पुण्यात काल बैठकीही झाली.

शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांना उमेदवार करण्याचा सर्वानुमते निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यानंतर पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांच्याकडे निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. अशातत, काल झालेल्या बैठकीनंतर शिवसैनिकांकडून संजय मोरे यांचे उमेदवार म्हणून पोस्टर व्हायरल करण्यात आले आहे. शिवसैनिकांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, भाजपनेही कसबा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. भाजपकडून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश आणि मुलगा कुणाल यांच्यासह हेमंत रासने, गणेश बीडकर आणि धीरज घाटे या पाच जणांची नावे प्रदेश कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. यात मतदारांचा कल कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आहे यासाठी भाजपकडून सर्व्हे केले जात आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवार यांची भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा