Shrikant Shinde | Aditya Thackeray
Shrikant Shinde | Aditya Thackeray Team Lokshahi
राजकारण

काही नेते तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले; खासदार शिंदेंची अप्रत्यक्षरित्या आदित्य ठाकरेंवर टीका

Published by : Sagar Pradhan

राज्याच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या विषयावरून जोरदार गदारोळ सुरू आहे. त्यातच दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष होत असताना त्यातच शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद देखील वाढतच चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भंडारा येथे आज (ता. ९) विविध विकास कामांचे भूमिपूजन होत आहे. तेथे जाण्यासाठी नागपूर विमानतळावर आले असता त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

नेमकी काय केली खासदार शिंदेंनी ठाकरेंवर टीका?

विमानतळावर खासदार शिंदेंना महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत पत्रकारांकडुन विचारणात आले असता. त्यावर बोलताना ते म्हणाले की, सत्तासंघर्षात न्यायालयाचा निकाल आमच्या म्हणजेच सत्याचा बाजूने लागेल. आज बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं आहे. काही नेते तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. संघर्ष काय असतो, हे त्यांना माहिती नाही. असे नेते कंत्राटदाराची भाषा बोलत असल्याची टिका त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केली.

पुढे ते म्हणाले की, हल्ली टीका करण्याचा स्तर घसरलेला असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्रदूषित करण्याचं काम सध्या सुरू आहे. सकाळपासून शिव्या शाप देण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे. महाराष्ट्राने यापूर्वी अशा पद्धतीच्या टिका पाहिल्या वा ऐकल्या नाहीत. आता मात्र आपसातच एकमेकांवर टीका होताना दिसून येत आहे. सत्तेसाठी विचारांना बाजूला करून ते एकत्र आले आहेत. वज्रमूठ एकजूट दाखवत आहे, ती वज्रमूठ राहते की वज्रझूठ ठरते हे पाहावे लागणार आहे. अशी टीका त्यांनी मविआवर केली.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...