राजकारण

नाना पटोलेंना गृहजिल्ह्यात मोठा धक्का! कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसचा दारुण पराभव

Published by : Shweta Shigvan-Kavankar

उदय चक्रधर | गोंदिया : जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आणि राष्ट्रवादी पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यातच त्यांना हा मोठा धक्का समजला जात आहे. सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आला आहे.

सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना एकत्रित निवडणूक लढले. यात त्यांना 18 पैकी 17 जागांवर विजय मिळविता आला आहे. तर फक्त एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे.

तर, गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्रित लढले तर काँग्रेसच्या एका गटाने काँग्रेसशी बंडखोरी करत भाजप राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केली होती. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस फुटीरगट यांना 18 पैकी 16 जागांवर विजय मिळवला आहे. तर एका अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली असून काँग्रेस पक्षाला फक्त एक जागेवर समाधान मानावे लागले आहे.

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...

Uddhav Thackeray : 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण