राजकारण

मी निर्लज्ज आहे असे समजा; भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवर सामंतांचे उत्तर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

चिपळूण : उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आज चिपळूण दौऱ्यावर आहेत. यादरम्यान उक्ताड येथे विकास कामांचे सामंतांनी धावत्या भेटीत उदघाटन केले. यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी उदय सामंतांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यावर मी निर्लज्ज आहे असे समजा, असे उत्तर उदय सामंत यांनी केले आहे.

चिपळूण दौऱ्यादरम्यान उदय सामंतांनी उक्ताड येथे विकासकामाचे उद्घाटन केले. परंतु, या उदघाटनावरून सामंत आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला आहे. इतक्या घाईत उद्घाटन कार्यक्रम करायची काय गरज? आम्हाला आमच्या नेत्यांचे बॅनर देखील लावता आले नाहीत, असे निलेश राणे यांचे खंदे समर्थक परिमल भोसले यांनी उदय सामंत यांना विचारले. यावर उदय सामंत यांनीही उत्तर दिले आहे.

मी आलो ते वाईट नाही ना झालं, असे म्हणत उदय सामंत म्हणाले, माझा सत्कार नाही केला किंवा माझे बॅनर नाही लागले याबद्दल मला काही वाटत नाही. मी निर्लज्ज आहे असे समजा, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, उदय सामंत यांनी स्थानिकांची समजूत काढत मी सर्व कामे करून द्यायलाच आलोय, असे बोलून वेळ मारून नेली.

दरम्यान, याआधी चिपळूण शहरातील आढावा बैठकीत उदय सामंताचा चांगलाच पारा चढलेला पाहायला मिळाला. नगरपरिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांना विकासकामांच्या तांत्रिक मंजुरीसाठी उशीर केल्याच्या मुद्द्यावरून जाब विचारला. यावेळी माझ्या स्पीडने काम करा, अशा सूचनाही नगरपरिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात आता हा चर्चेचा विषय ठरत आहे.

नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात; राज ठाकरेंची आज कणकवलीत सभा

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे