राजकारण

Uddhav Thackeray Interview : स्वतःला मोदी समजून पंतप्रधान पदावर दावा सांगतील, उध्दव ठाकरेंचा शिंदेंना टोला

मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रसारित केला जात आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर सडकून टीका केली आहे. उद्या हे पंतप्रधान पदावरही दावा सांगतील, त्यामुळे भाजपवाल्यांनो सावध राहा, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Published by : Shweta Chavan-Zagade

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीची सध्या चांगलीच चर्चा आहे. मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रसारित केला जात आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, 'प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो, सावधान... उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे, अशा शब्दात ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde )टीका केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत शिवसेना खासदार आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत (sanjay raut) यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा एक भाग काल प्रसिद्ध झाला होता. तर दुसरा भाग आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसादिवशी प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर सडकून टीका केली आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाला सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. ठाकरे म्हणाले, प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. उद्या हे महाशय स्वतःला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. भाजपावाल्यांनो सावधान.

आधी भाजपाबरोबर सत्तेत होतो, तेव्हा भाजपा त्रास देतोय असं म्हणायचे. भाजपा नको असं सांगणारे हेच लोक...गावागावात भाजपा सेनेला काम करू देत नाही, भाजपा शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. २०१९ साली भाजपाने खोटेपणाचा कळस केलाय. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे आता काँग्रेस राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणं शोधताय.

निवडणूक आयोगचा पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा, 'तुतारी'बाबत मोठा निर्णय

निवडणूक आयोगचा पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा, 'ट्रंम्पेट' चिन्हाचे मराठी भाषांतर 'ट्रंम्पेट'

'जरांगेंच्या डोक्यात आता राजकारणाचं वारं शिरलंय' प्रविण दरेकरांची जरांगेंवर टीका

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार; कारण काय?

Sada Sarvankar | अमित ठाकरेंनी अर्ज मागे घ्यावा, राज ठाकरे यांना भेटून विनंती करणार : सदा सरवणकर